मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर (Nitin Desai suicide case) आता कारणे समोर येऊ लागली आहेत. आत्महत्येनंतर सापडलेल्या वॉईज रेकॉर्डरमध्ये एडेलवाईज कंपनीने (Edelweiss Company) नितीन देसाई यांचा मानसिक छळ केल्याचा उल्लेख असल्याने त्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दरम्यान, नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाई (Manasi Desai) हिने यावर पहिल्यांदा भाष्य केले आहे. एडेलवाईज कंपनीने नितीन देसाई यांना खोटी आश्वासने दिली, माझ्या बाबांनी कोणालाही फसवलं नाही, असा आरोप मानसी देसाईने केला आहे.
मानसी देसाई म्हणाली, गेली दोन वर्षे डोनर कंपनीसोबत मीटिंग्ज करुन खूप प्रयत्न केले. यात कर्ज फेडण्यासाठीच्या उपायांवरही चर्चा झाली होती. कंपनीनेही त्यांना आश्वासनं दिली की सगळं हँडल करु आणि कंपनीदेखील कर्ज फेडण्यात मदत करेल. पण कंपनीने एकीकडे कायदेशीर कार्यवाही सुरु केली.
पुढे ती म्हणाली, गुंतवणूकदार पण बाबांची मदत करण्यासाठी तयार होते. पण कंपनीने काही मदत करु दिली नाही. माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की पुढे बाबांबद्दल काहीही खोट्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका. माझ्या बाबांनी खूप मेहनत करुन त्यांचं नाव कमावलं होतं, ते मातीत मिळवू नका, अशी विनंती मानसी देसाई यांनी केली.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…