Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रअण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील

अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील

कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कष्टकरी, उपेक्षित समाजाशी नातं सांगणार असून त्यांचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ व साहित्यिक ॲड. कृष्णा पाटील यांनी केले.

ते प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक व विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ. बाबुराव गुरव, माजी आमदार राजीव आवळे, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्रा. टी. के. सरगर, कवी व लेखिका डॉ. शोभा चाळके, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सन्मानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ समाजसेविका, धम्मलिपी प्रशिक्षिका, कवी आणि संपादिका छाया पाटील (मुंबई) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते डॉ. नंदकुमार गोंधळी (कोल्हापूर) यांना मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी तासगाव, जि. सांगलीचे माजी नगराध्यक्ष अमोल (नाना) शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर शाहीर दिपक गोठणेकर, किरण भिंगारदेवे, काळुराम लांडगे, लक्ष्मण माळी, रेवती आढाव, संग्राम मोरे, प्रा. डॉ. हाशिम वलांडकर, शंकर पुजारी, प्रा. डॉ. सविता व्हटकर, अभिजित पवार, सागर परीट, निलेश मोहिते, जयश्री चांदणे, रामचंद्र गुरव, सुनंदा दहातोंडे, डॉ. मानसी पवार, नंदू पवार, प्रा. विलास वैराळ, डॉ. शंकर अंदानी, विनोद त्रिभुवन गीता लळीत, विनोद आवळे, नथानियल शेलार, मुकुंद आव्हाड, डॉ. ज्ञानोबा कदम, डॉ. आनंद घन, मधुकर हुजरे, प्रा. डॉ. विजयकुमार सोन्नर, प्रा. अभय पाटील, छाया उंब्रजकर यादी मान्यवरांचा सन्मानचिन्ह व चार हजार रुपयांची पुस्तके देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी, तर सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर आणि नामदेव मोरे यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -