मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही किर्ती जगभरात होत आहे. सातासमुद्रापार चक्क न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम स्क्वेअरवर शिंदेंचा फोटो झळकला.
शिवसेनेत बंड करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. नंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. या घडामोडींनंतर त्यांची चर्चा फक्त ठाणे मु्ंबईपुरतीच मर्यादीत राहिलेली नाही. तर सातासमुद्रापारही पोहोचली आहे. चक्क न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम स्क्वेअरवर शिंदेंचा फोटो झळकला आहे.
विशेष म्हणजे, एकेकाळी आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून समजले जाणारे पण आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राहुल कनाल यांनीच हा उपक्रम राबविला आहे.