
मुंबई : अंधेरी ओशिवरा परिसरात इमारतीच्या सेफ्टी टॅकमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या व्यक्तीच्या शरिरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्यानं हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.
एसव्हीएस रोड, जोगेश्वरी येथील प्लॉट नं. ४, बिल्डिंग बांधकाम लेबरकॅम्प इथं हा मृतदह सेफ्टी टॅकमध्ये आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून अंदाजे ४० ते ५० वर्षाची ही व्यक्ती असण्याचा अंदाज पोलिसांचा आहे.
या मृतदेहाच्या दंडावर व हातावर गंभीर जखमा असून या व्यक्तीची हत्या करून पुरावे नष्ठ करण्याच्या हेतून त्याचा मृतदेह सेफ्टी टँकमध्ये टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३०२, २०१ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.