Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीPune Airport news : 'माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तोही चारही बाजूने'... अफवा...

Pune Airport news : ‘माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तोही चारही बाजूने’… अफवा पसरवणं आजीबाईला पडलं महागात…

सुरक्षा प्रशासनाची उडाली तारांबळ

पुणे : दिल्लीत राहणार्‍या एका ७२ वर्षीय आजीबाईला पुणे ते दिल्ली (Pune to Delhi) विमानाने प्रवास करायचा होता, पण पुणे विमानतळावर (Pune Airport) चेकिंगदरम्यान या आजीबाईने पोलिसांना थेट तिच्याकडे बॉम्ब असल्याची धमकी दिली. आजीबाईंची तब्बल एक तासभर चौकशी केल्यानंतर जे कारण समोर आलं त्याने तुम्हालाही हसावं की चुकचुकावं असा प्रश्न पडेल.

पुणे ते दिल्ली असा प्रवास करण्यासाठी ही आजीबाई सकाळी पुणे विमानतळावर दाखल झाली. नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे तिचे नाव आहे. विमानतळावर सकाळी बऱ्याच फ्लाईट्स असतात, त्यामुळे सुरक्षा तपासणीसाठी वेळ लागत होता. दरम्यान सुरक्षा तपासणी दरम्यान बूथमध्ये पोलीस अधिकारी जेव्हा आजीबाईंचा तपास करत होत्या तेव्हा त्यांनी “एवढं काय तपासत आहेत? माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो चारही बाजूने” असं सांगितलं. यामुळे विमानतळावर गोंधळ उडाला.

या प्रकरणी पुणे पोलीस यंत्रणा आणि बॉम्ब स्कॉड कामाला लागली. किमान तासभर आजीबाईंची चौकशी केली असता त्यांनी रागाच्या भरात सगळी धमकी दिल्याचं समोर आलं. विमानतळावर चेकिंगसाठी उशीर होत असल्याने त्या वैतागल्या आणि राग अनावर होऊन बॉम्ब असल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर यंत्रणा कामाला लागल्यानंतर पोलिसांनी थेट त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे धमकावणं आजीला चांगलंच महागात पडलं आहे.

महिला पोलीस कर्मचारी दीपाली बबनराव झावरे (रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. आर. करपे करीत आहेत. नीता कृपलानी या आजीबाईंवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -