Thursday, July 10, 2025

शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करणार

शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करणार

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


सदस्य अमिन पटेल यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान मुंबईतील शासकीय रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत १५ दिवसात बैठक घेण्यात येईल. या रुग्णालयातील सोयी सुविधांवर केलेल्या खर्चाचीही उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. तसेच धर्मादाय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांसाठी जी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी होते की नाही, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल.


ग्रामीण भागातून मुंबईमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची समस्या सोडवण्यासाठीही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत ॲड.आशिष शेलार, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

Comments
Add Comment