Monday, July 1, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीWamanrao Pai : अनंत रूपे अनंत वेषे...

Wamanrao Pai : अनंत रूपे अनंत वेषे…

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

परमेश्वर हा विषय आपल्या जीवनात इतका महत्त्वाचा आहे की, हा परमेश्वर क्षणोक्षणी, पावलो पावली आपल्यासोबत असतो. किंबहुना त्याच्याशिवाय आपल्याला एक क्षणही जगात येणार नाही, एक पाऊल टाकता येणार नाही इतके त्याचे महत्त्व आहे म्हणून परमेश्वराबद्दल जेवढे आपण जाणून घेऊ व जेवढे समजून घेऊ तितके आपले जीवन, आपला प्रपंच सुखकर ठरेल यासाठी मी हा विषय विस्ताराने घेतो आहे.

मी आधीच सांगितले आहे की, परमेश्वर हा निर्गुण होता तो सगुण झाला. निर्गुण परमेश्वर जो एक होता तो अनंत रूपे अनंत वेषे सगुण झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “अनंत रूपे अनंत वेषे देखिले म्या त्यासी.” अनंत हा शब्द अगदी अचूक आहे. अनंत म्हणजे त्याची आपल्याला गणती करताच येणार नाही. पशू , पक्षी, माणसे, चर व अचर ही सगळी जी निर्मिती झालेली आहे ती पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की त्याची निर्मिती ही अनंत आहे. आपल्याला त्याची कल्पनाही करता येणार नाही इतकी ती दिव्य व अनंत आहे. विश्वांत जगांत परमेश्वर हा अनंत रूपाने, अनंत वेषाने प्रगट झालेला आहे. जो प्रकट झाला तो, ज्याच्यात प्रगट झाला त्याच्यात वास करून राहिलेला आहे म्हणून त्याला वासुदेव म्हणतात.

सांगायचा मुद्दा तो सर्व ठिकाणी आहे, तो आपल्या ठिकाणी आहे, तो कुठे नाही असे होत नाही. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. एरव्ही संसारात सुद्धा आपण काही लोकांसाठी बरेच. पण आपल्याला त्याची जाणीव नसते. आता जीवनविद्येतसुद्धा किती लोक येतात व जातात कारण, जीवनविद्येने लोकांना काय दिलेले आहे, किती मौल्यवान ज्ञान दिलेले आहे याची लोकांना किंमत नाही. ज्यांना सद्गुरूंबद्दल जाणीव नाही, सद्गुरूंबद्दल कृतज्ञता नाही असे लोक आले व गेले कारण जाणीवच नाही. स्वरूपाची जाणीवच नाही कारण ते तर अव्यक्त आहे. पण सद्गुरू काय करतात हे दिसते, त्यांनी दिलेले ज्ञान दिसते तरी जाणीव नाही. स्वरूपाच्या ठिकाणी जरा वेगळे आहे. या ठिकाणी आपण आपल्याला विसरलेले आहोत. हे विसरणे अद्भुत आहे. हे साधे विसरणे नाही. २९ चा पाढा पूर्वी पाठ होता, आता म्हणायला सांगितला, तर म्हणता येईल की नाही? पूर्वी आठव होता आता ते विसरलो.

एक काळ असा होता की, आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव होती पण आता ती राहिलेली नाही.“तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती.” It is a thing of past. आता दोन ज्योती झाल्या. जीवज्योत व आत्मज्योत. वास्तविक मुळात ती एकच आहे, कल्पनेने दोन झाली. राजा भ्रमिष्ट झाला व भीक मागू लागला. भिकारी व राजा हे दोन दिसतात का? राजा तोच भिकारी व भिकारी तोच राजा. तसे इथे झालेले आहे. आज आपण आपले दिव्यत्व हरवून बसलेले आहोत त्यालाच माया म्हणतात. हे असे विषय समजून घेण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते आणि असे ज्ञान मिळवायला आवश्यकता असते ती सद्गुरू मार्गदर्शनाची.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -