Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीFake University: युजीसीने जाहीर केली देशातील २० बोगस विद्यापीठांची नावे

Fake University: युजीसीने जाहीर केली देशातील २० बोगस विद्यापीठांची नावे

युजीसीने जाहीर केली देशातील २० बोगस विद्यापीठांची(Fake University) नावे; या राज्यात सर्वाधिक बनावट विद्यापीठे

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने महाराष्ट्रासह देशभरातील बनावट विद्यापीठांची(Fake University) यादी जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २० ‘स्वयंभू’ संस्था बनावट (बोगस) घोषित केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या विद्यापीठांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षीही देशभरात २४ बोगस विद्यापीठे असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील २० बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली असून, या बनावट विद्यापीठांना (Fake Universities) पदवी देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे युजीसीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बनावट २० विद्यापीठांपैकी ८ विद्यापीठे ही दिल्लीतील असल्याची माहिती युजीसीने जाहीर केली आहे.

युजीसी कायदा (UGC Law) आणि तरतुदींच्या विरोधात जाऊन ही विद्यापीठे चालवली जात असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले होते. या विद्यापीठांकडून दिल्या जाणाऱ्या पदव्याही वैध नसून, उच्च शिक्षणासाठी त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत असे विद्यापीठ अनुदान आयोगाने सचिव मनीष जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावीनंतर अनेक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. मात्र प्रवेश घेताना संबंधित कोर्सला मान्यता आहे का, याची पडताळणी होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यूजीसीने बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर केली. “सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली २० विद्यापीठे यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन करुन सुरु आहेत. या विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही”, असे पत्रकही यूजीसीने जारी केलं आहे.

ही आहेत ‘बोगस’ विद्यापीठे

सर्वाधिक ‘बोगस’ विद्यापीठे असलेले राज्य : दिल्ली

दिल्लीमधील बोगस विद्यापीठांची यादी

 • कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज, दिल्ली
 • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS) राज्य सरकारी
 • विद्यापीठ, अलीपूर, दिल्ली
 • संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, दिल्ली
 • व्यावसायिक विद्यापीठ, दिल्ली
 • एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली
 • भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, नवी दिल्ली
 • स्व-रोजगारासाठी विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ, दिल्ली
 • अध्यात्मिक विश्व विद्यालय (अध्यात्मिक विद्यापीठ), रोहिणी, दिल्ली

दिल्ली पाठोपाठ ‘बोगस’ विद्यापीठे असलेले दुसरे राज्य : उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशमधील बोगस विद्यापीठांची यादी

 • गांधी हिंदी विद्यापिठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश
 • नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर, उत्तर प्रदेश
 • नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ), अलीगढ, उत्तर प्रदेश
 • भारतीय शिक्षा परिषद, भारत भवन, लखनौ, उत्तर प्रदेश

देशातील इतर राज्यांमधील ‘बोगस’ विद्यापीठे

 • क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर, आंध्र प्रदेश
 • बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
 • बडगनवी सरकार जागतिक मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्था, गोकाक, बेळगाव, कर्नाटक
 • सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, किशनट्टम, केरळ
 • राजा अरबी विद्यापीठ, नागपूर, महाराष्ट्र
 • श्री बोधी अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, पुद्दुचेरी
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता, पश्चिम बंगाल
 • इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, कोलकाता, पश्चिम बंगाल
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -