Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : दिल्या घरी तू मनाच्या श्रीमंतीत राहा!

Swami Samartha : दिल्या घरी तू मनाच्या श्रीमंतीत राहा!

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

एक तरुण मारवाडी श्री स्वामीरायांच्या सेवेत तीन वर्षे येऊन राहिला. त्याच्या घरची वारंवार पत्रे येऊनही तो घरी गेला नाही. तीन वर्षांनंतर त्याचा बाप व चुलता त्याला नेण्याकरिता अक्कलकोटी आले. त्यांनी चोळाप्पाकरवी श्री स्वामींस मुलास परत नेण्याची आज्ञा मागितली. त्यावर श्री स्वामी त्यास म्हणाले, “आपल्या घरी जा, मनाच्या श्रीमंतीत राहा व कधी कधी इथे येत जा.”श्री स्वामींची आज्ञा होताच श्री स्वामी भक्ताच्या दरबारात असताना त्या तिघांनी दर्शन घेऊन श्री स्वामींस विनंती केली की, “आता आम्ही देशाला जातो. आमच्यावर कृपा असावी.” तेव्हा तो तरुण मारवाडी श्री स्वामींच्या वारंवार पाया पडून “हे पाय आता आम्हाला अंतरले, कृपा करून महाराज पायांचे दर्शन कधी कधी देत जा आणि मला काही प्रसाद द्या.” त्याची विनंती ऐकून श्री स्वामी महाराज त्यास म्हणाले, “येथे देणे-घेणे, व्यापार काही नाही. प्रसाद पाहिजे असल्यास त्या हाडकातून चार हाडके घेऊन जा.”

समोरच असलेल्या हाडांच्या ढिगाऱ्यातून त्या तरुण मारवाड्याने भीत-भीत चार हाडे एका फडक्यात बांधून घेतली. नंतर ते तिघेही त्यांच्या घरी आले. आणलेले हाडकांचे गाठोडे घराबाहेर ठेवले. दुसरे दिवशी सकाळी ते गाठोडे उचलू लागला, तर ते त्याला जड लागले. गाठोडे सोडून पाहिले, तर हाडकांऐवजी सोने त्याच्या दृष्टीस पडले. त्या तरुण मारवाड्यासह सर्वांनाच आनंद झाला. त्याच्या तीन वर्षांच्या श्री स्वामी दरबारातील चाकरीबद्दल (सेवेबद्दल) त्यास चौपट प्रमाणात मिळाले. पुन्हा तो मारवाडी अक्कलकोटी आला. त्यतील १० तोळे सोने स्वामींपुढे ठेवून त्यांना दंडवत घातले. तो स्वामीरायांचा एकनिष्ठ दास बनला. त्याची स्वामींप्रती भक्ती वाढून त्याच्या गावी त्याची कीर्ती पसरली. त्याच्या आयुष्याचे सोने झाले.

स्वामी यशाचा
आधुनिक संदेश
जिथे कमी तिथे स्वामी
भक्ताला नाही काही कमी ।।१।।
भक्त पुसे कशी करावी प्रगती
साऱ्याची व्हावी चांगली प्रगती ।।२।।
स्वामी वदे स्वप्नी
लांब लांब तुडवावी वाट पहाटे ।।३।
योगासने करूनी प्रसन्न व्हावे पहाटे
१२ सूर्यनमस्कार घालावे पहाटे ।।४।।
करावे रोज थोडे भुजंगासन
मकरासन, हलासन, पद्मासन ।।५।।
तर कधी पवन मुक्तासन व नौकासन
हनुमंताचे वज्रासन अर्जुनाचे धनुरासन ।।६।।
प्रसन्न ठेवील ताडासन त्रिकोणासन
चक्रासन वक्रासन व बद्धपद्मासन ।।७।।
पोटाचे विकार जातील करता सुप्तवज्रासन
सर्वागासन, शलभासन कटी वक्रासन ।।८।।
मेंदू तल्लख होईल करता शीर्षासन
पूर्ण आराम वाटेल करता शवासन ।।९।।
आयुष्याची पार होईल नौका करता नौकासन
वीरपुत्र बनतील सारे करता वीरभ्रदासन ।।१०।।
पहाटेची बघता लाली
गाली येईल सुंदर लाली।।११।।
नको तुम्हाला पावरड स्नो फणी
योगासनाने प्रसन्न होतील सर्वजणी।।१२।।,
पहाटे उगवतो तेजस्वी सूर्यमणी
प्रसन्न होईल मंगळसूत्रमणी ।।१३।।
प्रसन्न हसते पाठी ती दत्तमूर्ती
कायावाचे तुम्हीच विष्णुलक्ष्मी मूर्ती।।१४।।
योगासने अंगात येते स्फुर्ती
लक्ष्मीप्रेमाने आशीर्वाद देती ।।१५।।
कामे करा जलदगती
कामाला देती गती ।।१६।।
आनंदी तब्येतीची ऐकता कथा यंदा
भक्त पुसे वाढवू कसा व्यापार धंदा ।।१७।।
स्वामी वदे तोंडात ठेवा साखर यंदा
गोड बोलून करावा धंदा ।।१८।।
गरम डोक्यावरती ठेवा बर्फ
ठेचून काढा वाईट सवई सर्प ।।१९।।
पायाला लावा भुईचक्र
हाती धरूनी सुदर्शनचक्र ।।२०।।
राहा सदा उत्साही
नेहमी राहा साहसी।।२१।।
धैर्यवान अदम्य साहसी
वाढवा बुद्धी परग्रहवासी ।।२२।।
राहा शक्तिमान प्रवासी
पराक्रम करा परआवासी ।।२३।।
सहा गोष्टी असता तेथे
साक्षत स्वामी धावतील तेथे।।२४।।
क्षणाक्षणाने वाचवा वेळ
कणाकणाने ठेवा पैशाचा मेळ।।२५।
सिंहाच्या मुखात प्रवेश न करिती हरीण
न शिकार करता सिंहस्थिती करुण।।२६।।
म्हणा शंभर वर्षे जगणार
भरपूर मी काम करणार ।।२७।।
समाजाची निस्वार्थ सेवा करणार
गुरू मातापिता सेवा मी करणार ।।२८।।
लक्षात ठेवा उद्या मरणार
आजच साऱ्या कामाचा तारणहार।।२९।।
ठेवा मोठे मोठे ध्येय
काम करूनी घ्या श्रेय ।।३०।।
बांधा मोठी उद्योग मंदिरा
तद्नंतर ती देव मंदिरा ।।३१।।
आधी शेकडोंना नोकरी चारा
नंतर गाई वासरू चारा ।।३२।।
आधी बांधा विद्यार्थीशाळा
नंतर त्या अपंग शाळा।। ३३।।
आधी बांधा पंचतारांकीत हॉटेल
नंतर बांधा कॅन्सरची इस्पितळे ।।३४।।
बांधा रस्ते, धरण, कालवे
शेतकरी पंपमोट चालवे।।३५।।
नका राहू नाजूक व्हा बळकट
खा नेहमी ताजे नको तेलकट ।।३६।।
खा भरपूर फळे, भाज्या
नेहमी असाव्या त्या ताज्या ताज्या ।।३७।।
मुलींना स्वरक्षणाचे धडे
गरीबांना वह्या पुस्तके धडे ।।३८।।
रडत कार्य नको कोणते
हसत आनंदाने कार्य ते शोभते ।।३९।।
बांधा भक्तांसाठी मजबूत घरे
मजबूत करा भगीनीची दारे ।।४०।।
बांधा वाटसरूसाठी धर्मशाळा
स्वच्छ, सुंदर, दणकट कर्मशाळा।।४१।।
द्या शेजारी मुलांबाळा प्रेम
दसपट येईल तम्हाकडेच प्रेम ।।४२।।
आठवा ती श्यामची आई
अन गाडगे बाबा, साई ।।४३।।
कर्म काशी वाई
चांगले कर्म आपली दाई ।।४४।।
नको वाट पाहू नको रे
केव्हा मरतात सासू-सासरे ।।४५।।
तुमचेही माता पिता उभेदारे
तरी आहेत कोणाचे सासू-सासरे ।।४६।।
नका ढकलू मातापिता वृद्धाश्रमी
घरी येईल कृष्ण आनंदाश्रमी ।।४७।।
मुलामुली शिकवा संस्कार
शोधा आनंदाचे प्रकार ।।४८।।
हसत खेळत करा संसार
द्या एकमेकां खरा आधार ।।४९।।
भक्तांचे आनंदाचे प्रावदान
हेच स्वामींचे भक्ताला दान ।।५०।।
भक्त् सुखी आनंदी सधन
स्वामींचे हेच आहे खरे धन ।।५१।।
काम कर दणादण
स्वामी नाम हेच खरे धन ।।५२।।
स्वामी बावन्नी संपूर्णम ।।

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -