चीनमध्ये मुलांच्या इंटरनेट वापरावर निर्बंध घातल्याने शेअर बाजार कोसळले!

बीजिंग : लहान मुलांमधील इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी चीन सरकारने कठोर पावले उचलली असून नव्या नियमानुसार, रात्री मुलांना स्मार्टफोन वापरण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. देशातील अठरा वर्षांखालील मुलांचा रात्री दहा ते सकाळी सहा या काळातील इंटरनेट अॅक्सेस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. येत्या दोन सप्टेंबरपासून लोकांशी व्यापक चर्चा केल्यानंतर या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.


मोबाईल इंटरनेट सेवेinteretच्या वापरासाठी वेगवेगळे टप्पे केले जाणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणीही करण्यात येईल. आठ वर्षांखालील मुलांना दिवसभरात केवळ चाळीस मिनिटेच मोबाईल इंटरनेटचा वापर करता येईल. सोळा ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हाच वेळ दोन तासांचा असेल.


‘सायबर अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना’ने (सीएसी) हे नवे प्रस्तावित नियम तयार केले असून ते जगातील सर्वाधिक कठोर नियम म्हणून ओळखले जातात.


दरम्यान या नियमांचे पालन करण्याची कोणतीही सक्ती केली जाणार नसून पालकांना जर बगल द्यायची इच्छा असेल तर ते याला टाळू देखील शकतात, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.


इंटरनेटचा अधिक सकारात्मक पद्धतीने वापर व्हावा, सभोवताली चांगले वातावरण निर्माण व्हावे, मुलांमधील इंटरनेट आणि स्मार्टफोनचे व्यसन कमी व्हावे आणि मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात या उद्देशाने हे नियम तयार करण्यात आले आहेत.


लहान मुलांच्या ऑनलाइन ओळखीचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांना वयोमानानुसार योग्य कंटेंट कसा मिळेल? त्याचबरोबर त्यांच्यावरील वाईट माहितीचा प्रभाव कसा कमी होईल? हा देखील यामागचा प्रमुख उद्देश आहे.


नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा लहान मुलांवरील प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नियम अधिक कठोर करायला सुरूवात केली आहे. यासाठी देशांतर्गत इंटरनेट कंपन्यांवर देखील वेगवेगळी बंधने घातली जात आहेत.


चीनने २०२१ मध्ये लहान मुलांच्या गेमिंगसाठीच्या वेळेला कात्री लावली होती. चीन सरकारच्या नव्या प्रस्तावित नियमांचे परिणाम शेअर बाजारामध्ये देखील दिसून आले. यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर