नवी दिल्ली : गेल्या महिन्यात बीसीसीआयने (BCCI) वनडे वर्ल्डकपचे (World Cup Schedule) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा १५ ऑक्टोबर घटस्थापनेदिवशीच होणार होता. मात्र गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी होणार्या प्रचंड गर्दीमुळे बीसीसीआयला सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली होती. त्यानुसार हा सामना १४ ऑक्टोबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता वर्ल्डकपच्या सहा मोठ्या सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
अलीकडेच बीसीसीआय सचिव म्हणाले होते की, २०२३ च्या वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात(World Cup Schedule) बदल केले जाऊ शकतात. यासंदर्भात अधिकृत वेळापत्रक आज किंवा उद्या प्रसिद्ध केले जाऊ शकते. आतापर्यंत कळलेल्या तारखांनुसार वर्ल्डकपच्या वेळापत्रकात पुढीलप्रमाणे बदल असतील-
१. भारत आणि पाकिस्तान – १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबर
२. पाकिस्तान आणि श्रीलंका – १२ ऑक्टोबर ऐवजी १० ऑक्टोबर
३. न्यूझीलंड आणि नेदरलँड्स – ९ ऑक्टोबर ऐवजी १२ ऑक्टोबर
४. न्यूझीलंड आणि बांगलादेश – १४ ऑक्टोबर ऐवजी १५ ऑक्टोबर
५. अफगाणिस्तान आणि इंग्लंड – १४ (संध्याकाळी) ऐवजी १४ ऑक्टोबर (दिवस)
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप ५ ऑक्टोबर २०२३ ते १९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारताच्या यजमानपदी खेळवला जाईल. या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांची तात्पुरती वेळ सकाळी १०:३० आणि दुपारी २:०० अशी ठेवण्यात आली आहे. विश्वचषक जवळ आल्याने सामन्यांच्या वेळेतही बदल केले जाऊ शकतात.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…