Friday, October 11, 2024
Homeदेशहरियाणातील नूहमध्ये हिंसाचार चिघळला! २२ गुन्हे दाखल, १५ जणांना अटक

हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार चिघळला! २२ गुन्हे दाखल, १५ जणांना अटक

गुरुग्राम : हरियाणातील नूह येथून उसळलेला हिंसाचाराचा वणवा आता गुरुग्रामपर्यंत पोहोचला आहे. हिंसाचार प्रकरणी नूह पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. हरियाणातील नूह आणि गुरुग्राम जिल्ह्यात जातीय हिंसाचारानंतर तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंसाचार पसरवणा-यांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे.

हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेदरम्यान हिंसाचार आणि नंतर गोंधळ झाला. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. नूहमध्ये दोन दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण परिसरात निमलष्करी दलाच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. रेवाडी, गुडगाव, पलवल, फरीदाबादसह ५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये, २२ जणांवर गुन्हा दाखल केला असून, १५ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, सुमारे १५० पेक्षा जास्त लोकांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.

नूहचे पोलीस अधीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत २२ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. १५ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे १५० जणांची चौकशी करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी नूह येथे मिरवणुकीत हिंसाचार झाला होता, त्यानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यासोबतच इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -