
गुंतवणूकदारांच्या ३.५६ लाख कोटींचा चुराडा
शेअर बाजारासाठी(share market) आजचा दिवस नकारात्मक राहिला. जवळपास सर्वच क्षेत्रात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये(Sensex) आज ६७७ अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्येही बुधवारी २०७ अंकांची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल ३.५६ लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आज बुधवारी सेन्सेक्समध्ये(Sensex) ६७७ अंखांची घसरण झाली असून तो ६५ हजार ७८२ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये २०७ अंकांची घसरन होऊन तो १९ हजार ५२६ अंकांवर बंद झाला. अमेरीका, युरोप आणि चीनमधील कमकुवत आर्थिक आकड्यांमुळे जागतिक बाजारात गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतला. त्यामुळे वॉल स्ट्रीट आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाल्यो पाहायला मिळाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची देखील ३२ पैशांनी कमकुवत होऊन डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.५८ वर बंद झाला.
शेअर बाजारात आज बुधवारी झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठाच फटका बसला आहे. त्यांच्या ३.५६ लाख कोटी रूपयांचा चुराडा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या एकूण भांडवल ३०६.८० लाख कोटीवरून ३०३.२४ लाख कोटीवर पोहोचले आहे.