IND vs WI: खेळाडूंना मूलभूत सुविधा तरी द्या

विंडिज क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनावर पंड्याने व्यक्त केली नाराजी


विंडिज दौऱ्यादरम्यान(IND vs WI) दिल्या गेलेल्या सुविधांबाबत भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. वेस्ट इंडिज बोर्डाने प्रवासासारख्या गोष्टींकडे थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे. खेळाडूंना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत, असे पंड्या म्हणाला.


पंड्या म्हणाला की, एकदिवसीय मालिकेच्या आधी विमानाला ४ तास उशीर झाल्याची तक्रारही अनेक वरिष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली होती. त्यामुळे सामन्यापूर्वी खेळाडूंना पुरेशी झोप घेता आली नाही. पुढच्या वेळी आम्ही वेस्ट इंडिजमध्ये आलो, तर परिस्थिती सुधारण्याची आशा करतो. वेस्ट इंडीज बोर्डाने प्रवासासारख्या गोष्टींकडे थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आम्ही चैनीची मागणी करत नाही, तर मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत.


आपल्या अर्धशतकीय खेळीबद्दल हार्दिक म्हणाला की, 'मला फलंदाजी करताना मैदानात टिकायचे होते. मी सामन्यापूर्वी विराट कोहलीशी बोललो. त्याने मला खेळपट्टीवर थोडा वेळ घालवण्यास सांगितले आणि ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये जुळवून घेण्याचा सल्ला दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया : सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार, १० जणांचा मृत्यू

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बोंडी बीचवर (समुद्रकिनारा) ज्यू नागरिक हनुक्का उत्सव साजरा करत असताना दोन

आसाममध्ये माजी हवाई दल अधिकारी कुलेंद्र सरमाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश गुवाहाटी : पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी हेरगिरी

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.