Monday, October 20, 2025
Happy Diwali

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

‘पालघर जिल्ह्यातील किराट गाव येथे मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित करताना झालेला गैरव्यवहार’ याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य मनीषा चौधरी, नाना पटोले, राजेश पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, या प्रक्रियेत अनेक विभागांचा सहभाग आहे. या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात येतील आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.

Comments
Add Comment