Mumbai News : घाटकोपर बेस्ट डेपोतील कर्मचारी अचानक संपावर, प्रवाशांचे हाल!

मुंबई : घाटकोपर बेस्ट डेपोतील (Ghatkopar BEST Depo) बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे नोकरदार मुंबईकरांचे (Mumbai News) मात्र हाल होत आहेत.


बेस्टच्या घाटकोपर डेपो मधील कंत्राटी चालक आज सकाळपासून अचानक संपावर गेले आहेत. पगारवाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांबाबत हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या बेस्टच्या कंत्राटी कामगारांनीही हा संप केला आहे. मात्र याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. सकाळी सकाळी कार्यालयात निघालेल्या मुंबईकरांचे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे गैरसोय होत आहे.


दरम्यान, संप पुकारल्यानंतर आज हे सर्व कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पगार वाढीची मागणी प्रलंबित आहे. त्यांना साधारणतः सध्या १६ हजार रुपये वेतन मिळत आहे. हे सर्व कर्मचारी त्यांचे हे वेतन २५ हजार रुपयांपर्यंत वाढवावे अशी मागणी करत आहेत. मात्र त्यांची ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.


तसेच, पगारवाढीसोबतच इतरही सुविधा मिळाव्यात अशी मागणीही या कंत्राटी कर्मचाऱ्यांची होती, मात्र अद्याप ही मागणीही पूर्ण झालेली नाही. याच मागण्यांसाठी घाटकोपर डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.

निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज

एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन

पदभरती करा अन्यथा पशुवैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द

६० टक्के रिक्त पदांमुळे कारवाईची टांगती तलवार मुंबई : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत