Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीOnline Shopping : फ्लिपकार्ट वरुन लॅपटॉप, एसी घेत असाल तर सावधान!

Online Shopping : फ्लिपकार्ट वरुन लॅपटॉप, एसी घेत असाल तर सावधान!

नोकिया (Nokia) ब्रँडच्या नावावर फ्लिपकार्ट खपवते स्वत:चे उत्पादन, फ्लिपकार्टचे सर्व्हिस सेंटर नसल्याने ग्राहक त्रस्त

मुंबई : फ्लिपकार्टने (Flipkart) नोकिया (Nokia) सारख्या मोठमोठ्या ब्रँडच्या लॅपटॉप, एसीसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीसाठी (Online Shopping) त्यांच्या वेबसाईटवर मोठ-मोठे सेल-ऑफर (offer) दिले आहेत. ग्राहक या आकर्षक ऑफरला भूलून स्वस्तात मिळणारे लॅपटॉप, (Nokia Laptop) एसी खरेदी करतात आणि महिनाभरातच पस्तावतात. असे प्रकार मुंबईत अनेक ठिकाणी घडल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

याप्रकरणी तक्रार तरी कोणाकडे करायची असा प्रश्न या ग्राहकांना पडला आहे. उदाहरणार्थ नोकिया कंपनीचा लॅपटॉप घेतला आणि त्यात बिघाड असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ऑनलाईन खरेदी केल्यामुळे थेट दुकानदाराकडे जाता येत नाही. फ्लिपकार्टकडे संपर्क केला तर ते सांगतात की नोकिया कंपनीच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जा. मात्र नोकिया सर्व्हिस सेंटरवाले सांगतात की, आमच्याकडे फक्त नोकियाचे मोबाईल संबंधित दुरुस्तीची कामे होतात. नोकिया कंपनी लॅपटॉपचे स्वत: उत्पादन करतच नाही.

याबाबत अधिक माहिती घेतली असता असे निदर्शनास येते की, फ्लिपकार्ट कंपनीने नोकिया कंपनीशी करार केला असून नोकिया या ब्रँडचा केवळ नावाचा वापर करुन फ्लिपकार्ट कंपनीने स्वत:च भारतात लॅपटॉप व एसी उत्पादन करुन ते ऑनलाईन द्वारे विकले जातात. फ्लिपकार्टचे स्वत:चे सर्व्हिस सेंटर मुंबईत कुठेही नाही.

 

त्यांच्या वेबसाईटवर असलेला 08046331010 हा एकमेव संपर्क क्रमांक मुंबईमधील फोर्ट येथील असून तो सध्या बंद आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.

फ्लिपकार्ट ऑनलाईन बिल देत असलेली Tech-Connect Retail Private Limited ही कंपनी १३ मे २०१० रोजी हरियाणामधील गुरगांव येथे नोंदणी केलेली कंपनी असून या कंपनीचे संजय कपूर आणि सीमा कपूर हे संचालत आहेत. तर फ्लिपकार्टने Tech-Connect Retail Private Limited या कंपनीमार्फत विक्री केलेल्या कंपनीचा शिपिंग पत्ता हा पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील Instakart Services Private Limited या कंपनीचा आहे. त्यांच्याशी थेट संपर्क होत नाही.

त्यामुळे स्वस्तात मिळते म्हणून ऑनलाईन खरेदीसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर जाऊन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेणार असाल तर आधी सगळी चौकशी करा, अन्यथा नंतर पस्तावण्याची पाळी येईल.

फ्लिपकार्ट कंपनीने अशा प्रकारे छोट्या-छोट्या कंपन्या दाखवून मोठ्या प्रमाणावर घोटाळा केल्याची दाट शक्यता आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या ते सापडत नसल्याने आणि कोण त्या भानगडीत पडून वेळ वाया घालवणार या वृत्तीमुळे सदर प्रकारात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतरही ग्राहक मूग गिळून गप्प बसतात. नेमका याचाच फायदा फ्लिपकार्टने घेतला आहे.

फ्लिपकार्ट ही भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बंगळूरू, कर्नाटक येथे आहे. फ्लिपकार्टची स्थापना सचिन बन्सल व बिन्नी बन्सल यांनी सन २००७ मध्ये केली आहे. सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टने आपले लक्ष विविध पुस्तके विकण्यात केंद्रित केले होते. परंतु आता ते वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींची विक्री करता करता मोठ्या कंपन्यांचे ब्रँडच्या नावाचा वापर करुन ते स्वत: उत्पादन करून त्याची विक्री करतात. मात्र फ्लिपकार्टच्या ग्राहकांना नंतर योग्य प्रकारे सर्व्हिस उपलब्ध होत नसल्याचे एका ग्राहकाने सांगितले.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -