Death of Cheetah : कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू

Share

११ महिन्यांमध्ये नऊ चित्ते मृत

श्योपुर : देशात चित्त्यांची संख्या घटत असल्याने राबवण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’मधील (Project Cheetah) आणखी मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) मरण पावलेला हा नववा चित्ता होता. मध्य प्रदेश वनविभागानं म्हटलं आहे की, कुनोतील मादी चित्त्यांपैकी एक चित्ता धात्री (Dhatri) आज सकाळी मृतावस्थेत आढळून आली आहे. मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी चित्त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जात आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता पुनरुज्जीवनासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते आणण्यात आले होते. मात्र आतापर्यंत एकूण ९ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा चित्ते आणि कुनो येथे जन्मलेल्या तीन बछड्यांचा समावेश आहे. आज मरण पावलेली चित्ता मार्च महिन्यापासून मरण पावलेली सहावी प्रौढ चित्ता आहे. १४ चित्ते कुनोच्या आवारात ठेवण्यात आले आहेत, ज्यामध्ये सात नर, सहा मादी आणि एक मादी बछडा यांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्ताचाही ११ जुलै रोजी मृत्यू झाला होता. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता जखमी अवस्थेत आढळून आला. तेजसच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसत होत्या. चित्त्यांच्या मृत्यूबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या सुनावणीत खंडपीठाने चिंता व्यक्त केली होती. केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. इतर अभयारण्यातही त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असं ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

27 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

2 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

3 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

4 hours ago