Thursday, November 7, 2024
Homeताज्या घडामोडीAmazing : देशातील ४००१ आमदारांकडे ५४,५४५ कोटी रुपयांची संपत्ती!

Amazing : देशातील ४००१ आमदारांकडे ५४,५४५ कोटी रुपयांची संपत्ती!

कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार

नवी दिल्ली : देशातील सुमारे ४ हजार आमदारांकडे एकूण ५४ हजार ५४५ कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या २०२३-२४ च्या एकूण बजेटपेक्षा ही रक्कम जास्त आहे. एडीएआर या स्वयंसेवी संस्थेने २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ४०३३ पैकी ४००१ आमदारांच्या निवडणूकपूर्व शपथपत्रांच्या आधारे संपत्तीचे विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे. यात एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३.६३ कोटी रुपये आहे.

हे आमदार ८४ राजकीय पक्षांचे असून त्यात अपक्षांचाही समावेश आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे १,४१३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत.

  • अपक्ष ९५ आमदारांकडे एकूण २,८४५ कोटी रुपये आहेत.
  • भाजपच्या १,३५६ आमदारांची संपत्ती १६,२३४ कोटी रुपये.
  • काँग्रेसच्या ७१९ आमदारांची संपत्ती १५,७९८ कोटी रुपये आहे.
  • एकूण संपत्तीमध्ये या दोन प्रमुख पक्षांच्या आमदारांचा एकूण वाटा ५८.७३ टक्के आहे.
  • २९.९४ कोटी रुपये अपक्ष आमदारांची सरासरी मालमत्ता.
  • १३.६३ कोटी रु. आमदारांची सरासरी मालमत्ता.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -