३१ जुलैपर्यंत दोन हजारांच्या ८८ टक्के नोटा बँकांमध्ये जमा
मुंबई : भारतीय रिझर्व बँकने (आरबीआय) १९ मे रोजी दोन हजारांच्या नोटा चलनातून माघारी घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकांमध्ये २३ मेपासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. मात्र अद्यापही तब्बल ४२ हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा केलेल्या नाहीत. या नोटा कुणाकडे असतील, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या एकूण ८८ टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत.
आरबीआयच्या माहितीनुसार, १९ मे २०२३ पर्यंत ३.५६ लाख कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये होत्या. त्यापैकी ३१ जुलै पर्यंत ३.१४ लाख कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. त्यामुळे आता फक्त ४२ हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनामध्ये उरल्या आहेत. ३० सप्टेंबर २०२३ ही दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची शेवटची तारीख आहे.