Rain Updates : राज्यात पुढील चार ते पाच दिवस कोसळणार धो-धो पाऊस... मात्र ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी

जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणत्या राज्यात कोणता अलर्ट?


मुंबई : राज्यात सगळीकडे हाहाकार माजवल्यानंतर गेले दोन दिवस पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान खात्याने (Indian Metrological Deaprtment) नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Rain updates) आहे. बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा (Deep Depression) पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढील २४ तासांत पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धो-धो पावसाला सुरुवात होऊ शकते.


भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.





२ ऑगस्ट

ऑरेंज अलर्ट - मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा
यलो अलर्ट - कोल्हापूर, रत्नागिरी, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ



३ ऑगस्ट

ऑरेंज अलर्ट - मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा
यलो अलर्ट - कोल्हापूर, रत्नागिरी, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ



४ ऑगस्ट

यलो अलर्ट - मुंबई, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग आणि सातारा



ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस


राज्यात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पाहायला मिळाला. पण ऑगस्ट महिना हा अधिकाधिक प्रमाणात कोरडा जाण्याचीच शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील दोन महिन्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या दोन महिन्यांमध्ये देशात मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक