पुणे : ‘लोकमान्य टिळक यांची आज १०३वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक देणार्या महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो’, अशा प्रकारे मराठीने आपल्या भाषणाची सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM narendra Modi) पुणेकरांची मने जिंकली. मोदीजी भाषणासाठी येताच पुणेकरांनी मोदींच्या नावाचा एकच जल्लोष सुरु केला. आज टिळक स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) प्रदान करण्यात आला. सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मोदीजी म्हणाले, ‘हा पुरस्कार घेताना मी जितका उत्साही आहे तितकाच भावूक झालो आहे’. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरव मोदीजींनी आपल्या भाषणात केला. ‘या महत्त्वाच्या दिवशी पुण्याच्या या पावनभूमीवर आणि महाराष्ट्राच्या धरतीवर येण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे’ हे वाक्य मोदींनी मराठीत म्हटल्याने सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
मोदीजी म्हणाले, ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधूंची पवित्र धरती आहे. तसेच ती ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची आदर्श भूमी आहे. काशी आणि पुणे या शहरांची देशात विशेष ओळख आहे. इथs विद्वत्ता, चिरंजीवी आणि अमरत्वता प्राप्त झालेली आहे. या भूमीमध्ये माझा सन्मान होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा कुठला पुरस्कार मिळतो, तेव्हा एक जबाबदारी येते. हा पुरस्कार मी १४० कोटी देशवासियांना समर्पित करतो. देशवासियांच्या सेवेत, अपेक्षांमध्ये कोणतीही कसर मी सोडणार नाही, असा विश्वास मोदीजींनी व्यक्त केला.
टिळकांच्या नावातच गंगाधर आहे. ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे, त्यांच्या नावावर मिळालेल्या या पुरस्कारासोबत जी रक्कम मला मिळाली आहे, ती सर्व गंगा नदीसाठी समर्पित करणार आहे. मी नमामि गंगा या प्रोजेक्टला हा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…