Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

PM Narendra Modi : कर्नाटकात सरकार बदललं आणि दुष्परिणाम दिसायला लागले...

PM Narendra Modi : कर्नाटकात सरकार बदललं आणि दुष्परिणाम दिसायला लागले...

पुण्यात मेट्रो उद्घाटनावेळी मोदींनी कर्नाटक सरकारला केले लक्ष्य


काय म्हणाले मोदीजी?


पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya Tilak Purskar) प्रदानाचा कार्यक्रम पार पडताच मोदीजी थेट शिवाजीनगरला होणार्‍या कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कर्नाटक सरकारला लक्ष्य केले. कर्नाटकात सरकार बदललं आणि दुष्परिणाम दिसायला लागले, असं म्हणत मोदीजींनी विरोधकांवर निशाणा साधला.


पंतप्रधान मोदी म्हणाले, फिनटेक, बायोटेक, अॅग्रीटेक प्रत्येक क्षेत्रात देश प्रगती करत आहे. याचा मोठा लाभ पुण्यालादेखील होत आहे. एकीकडे महाराष्ट्रात विकास होत आहे तर दुसरीकडे शेजारचं राज्य कर्नाटकात काय होतंय ते समोर येत आहे. बंगळूरू मोठं आयटी हब आणि ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटर आहे. यावेळी कर्नाटकाचा गतीने विकास होणं अपेक्षित होतं परंतु सरकार बदललं आणि जनतेचं नुकसान झालं. कर्नाटकमध्ये ज्या प्रकारच्या घोषणा करुन सरकार बनवलं त्याचे दुष्परिणाम कमी वेळेत दिसून येऊ लागले आहेत. जेव्हा कोणता पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारची तिजोरी मोकळी करतो तेव्हा जनतेचं, तरुणांचं मोठं नुकसान होत असतं. त्या पक्षाचं सरकार तर बनतं परंतु लोकांचं भविष्य अंधारात जातं.


कर्नाटक सरकार मान्य करत आहे की, त्यांच्याकडे बंगळूरु आणि कर्नाटकाच्या विकासासाठी बजेट नाही. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. अशीच स्थिती राजस्थानमध्येही आहे. कर्जाचा बोजा वाढतोय आणि विकास ठप्प झाला आहे. नीती, नियत आणि निष्ठा विकासासाठी आवश्यक असते, असं मोदी म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment