
टिळक पुरस्कार स्विकारल्यानंतर पंतप्रधान थेट शिवाजीनगरला उदघाटनासाठी झाले रवाना
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम पार पडताच मोदीजी थेट शिवाजीनगरला होणार्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोर्हे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात आला. यावेळेस त्यांना शाल, लोकमान्य टिळकांची प्रतिमा तसेच मेट्रोची प्रतिमा सन्मानपूर्वक देण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात पंतप्रधानांच्या विकासकामांचा आढावा घेतला आणि त्यांचे भरभरुन कौतुक केले. पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांमध्ये 'वनाज ते रुबी हॉल' आणि 'सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय' या मर्गांचा समावेश आहे. या विस्तारित मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास सुसह्य होणार आहे.
पुण्यात मेट्रोचा एक नवीन टप्पा सुरु करण्यात आहे. याआधी पंतप्रधान मोदीजींच्याच हस्ते पुण्यातील मेट्रोचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. पहिल्या टप्प्याचं अनावरण करण्यात आलं आणि आता दुसर्या टप्प्याचंही अनावरण मोदीजीच करणार आहेत, अशी आनंदाची बाब देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितली. या कार्यक्रमावेळी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या विकासाला साथ दिली, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासकामाला देखील साथ दिली आहे', असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आज पुण्यात मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे. तसेच विविध प्रकल्पांचं लोकार्पण, भूमीपूजन होत आहे. मुंबईतदेखील मेट्रो २ आणि मेट्रो ७ चं लोकार्पण मोदीजींनी केलं आणि त्यामुळे लाखो मुंबईकर प्रवाशांना दिलासा मिळतो आहे. तसाच दिलासा पुणेकरांनादेखील मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.