Friday, July 19, 2024
Homeक्रीडाwwe : डब्ल्यूडब्ल्यूईचा लाईव्ह थरार भारतात रंगणार

wwe : डब्ल्यूडब्ल्यूईचा लाईव्ह थरार भारतात रंगणार

८ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचा(wwe) रणसंग्राम

डब्ल्यूडब्ल्यूईचा(wwe) लाईव्ह थरार आता भारतात पहायला मिळणार आहे. २०१७ नंतर प्रथमच भारतीय चाहत्यांना आपल्या देशात डब्लूडब्लूईच्या लाईव्ह फाईटचा आनंद घेता येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतात डब्लूडब्लूईचा रणसंग्राम होणार आहे.

भारतात सप्टेंबर महिन्यात डब्ल्यूडब्ल्यूई(wwe) सुपरस्टार स्पेक्टेकल रंगणार आहे. हैदराबादमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचा थरार अनुभवता येणार आहे. पहिल्यांदाच हैदराबादमध्ये डब्लूडब्लूई लाईव्ह फाईटचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटने दिली आहे. ८ सप्टेंबर रोजी डब्लूडब्लूई लाईव्ह सामने पाहायला मिळणार आहे. हैदराबादमधील गचीबोवली इनडोअर स्टेडियममध्ये डब्लूडब्लूईचे लाईव्ह सामने रंगणार आहेत.

वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन सेट रोलिन्स, वुमेन्स वर्ल्ड चॅम्पियन रिया रिपली, डब्ल्यूडब्ल्यूई टॅग टीम चॅम्पियन्स समी झायन आणि केविन ओन्स, इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन गंथर, जिंदर महाल, वीर महान, सांगा, बेकी लिंच, नताल्या, मॅट रिडल, लुडविग कैसर यासारख्या आणखी डब्ल्यूडब्ल्यूई(wwe) स्टार्संना भारतात लाईव्ह मॅचमध्ये पाहता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -