Wednesday, April 30, 2025

महामुंबईमहाराष्ट्रमनोरंजनताज्या घडामोडी

Maharashtrachi Hasyajatra : तुमच्या टेन्शनवरची मात्रा... महाराष्ट्राची हास्यजत्रा! नव्या पर्वाचं शुटींग सुरु...

Maharashtrachi Hasyajatra : तुमच्या टेन्शनवरची मात्रा... महाराष्ट्राची हास्यजत्रा! नव्या पर्वाचं शुटींग सुरु...

प्राजक्ता माळीने शेअर केला खास व्हिडीओ...

मुंबई : महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना खळखळून हसवणार्‍या सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या मालिकेच्या नव्या पर्वाचे शुटींग सुरु झाले आहे. लॉकडाऊनमध्ये विशेष लोकप्रियता मिळवलेली हास्यजत्रा आता लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली आहे. नुकतंच हास्यजत्रेच्या टीमने परदेश दौरा केला. यातील कलाकार सातत्याने या परदेश दौर्‍याचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत होते. आज हास्यजत्रेची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने एक व्हिडीओ शेअर हास्यजत्रेचे शुटींग सुरु झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.

प्राजक्तानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आणि काल शूटींगला सुरूवात झाली… खूप आवश्यक असणाऱ्या लाफ्टर थेरपीची सुरू झाली आहे. १४ ऑगस्ट पासून सोम-गुरू रात्री ९ वाजता.' प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) देखील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक (Prasad oak)आणि प्राजक्ता माळी देखील दिसत आहेत. या व्हिडीओला सईनं 'Back to MHJ' असं कॅप्शन दिलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून समीर चौघुले (Sameer Choughule), नम्रता संभेराव (Namrata Sambherao), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar), वनिता खरात (Vanita Kharat), प्रभाकर मोरे (Prabhakar More), गौरव मोरे (Gaurav More), शिवाली परब (Shivali Parab), पृथ्वीक प्रताप (Pruthvik Pratap), दत्तु मोरे (Dattu More), प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar), ईशा डे (Esha Dey) असे सर्वच कलाकार प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यामुळे नव्या पर्वाची सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment