नवी दिल्ली : आयकर रिटर्न भरण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे. आयकर विवरण भरण्यासाठी आजचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. रविवार दुपारपर्यंत ६ कोटी नागरिकांनी आयकर विवरण दाखल केले असल्याची माहिती आयकर विभागाने दिली. सध्या तरी सरकारने मुदत वाढवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. गेल्या वर्षीही मुदत वाढवण्यात आली नव्हती.
आयकर विभागाने द्वीट करत म्हटले आहे की, ३० जुलै रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ५.८३ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत दाखल केलेल्या आयटीआर पेक्षाही ही संख्या अधिक आहे.
रविवार दुपारपर्यंत ४६ लाख अधिक यशस्वी लॉगिन झाले आहेत. शनिवारी १.७८ कोटींहून अधिक लॉगिन करण्यात आले होते. रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत १०.३९ लाख आयटीआर दाखल झाल्याची माहितीही विभागाने दिली. कमी परतावा मिळाल्यास अपीलाचीही तरतूद आयकर विभागाने करचोरी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयकर विवरणात त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे याची काळजी घेतली जाते.
सुधारित विवरणपत्र 139(5) अंतर्गत भरा
आयकर कायद्यांतर्गत आयकर रिटर्न भरल्यानंतरही तुम्ही तुमचा आयटीआर पुन्हा दुरुस्त करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 139(5) अंतर्गत, करदाते सुधारित आयकर रिटर्न भरून आयटीआरमध्ये झालेल्या चुका सुधारू शकतात. या कायद्यानुसार, आयटीआर भरल्यानंतर, जर करदात्याला असे वाटत असेल की त्याने काही बाबी जाहीर केल्या नाहीत अथवा चूक झाली आहे. तर, तो सुधारित आयकर विवरण दाखल करू शकतो.
प्रोसेसिंग-रिफंड मिळाल्यानंतरही सुधारित आयकर रिटर्न भरण्यास मुभा
करदात्यांना ही दिलासा देणारी बाब आहे की त्यांच्या आयकर रिटर्नवर प्रक्रिया झाली असली तरी ते कलम 139(5) अंतर्गत ऑनलाइन रिव्हाइज रिटर्न भरू शकतात. करदात्याच्या आयटीआरची प्रक्रिया केली गेली आहे आणि त्याला परतावा जारी केला गेला आहे, अशा प्रकरणांमध्ये, रिफंड मिळाल्यानंतरही, आयटीआर दुरुस्त करण्यासाठी करदाता सुधारित रिटर्न दाखल करू शकतो.