
शोधमोहीम सुरु... काय आहे आत्महत्येचं कारण?
आज दिवसभरात केवळ मुंबईतूनच थरकाप उडवणार्या (Mumbai News) घटना समोर येत आहेत. जयपूर एक्स्प्रेस दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच आता आत्महत्येची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून (Bandra Worli Sea Link) एका ५५ वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सी लिंकवर कार थांबवून या व्यक्तीने तटरक्षक दलाला काही कळायच्या आत थेट पाण्यात उडी मारली. सध्या तटरक्षक दलाच्या मदतीने मुंबई पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. हेलिकॅाप्टरच्या साहाय्याने या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास विलेपार्ले येथे राहणारी एक ५५ वर्षीय व्यक्ती कारमधून वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात होती. यानंतर गाडी पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने गाडी थांबवली आणि थेट समुद्रात उडी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून उडी मारलेल्या व्यक्तीच्या शोधात तटरक्षक दलासह इतर पथकंही गुंतली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे आत्महत्येचं कारण?
ही ५५ वर्षीय व्यक्ती नुकतीच एका अपघातामुळे अस्वस्थ झाली होती. प्रकृतीला कंटाळून वृद्धेने सोमवारी वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारली. सकाळी केबल-स्टेड स्ट्रक्चरमधून हा माणूस अरबी समुद्रात बुडला. सध्या या व्यक्तीला शोधण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी हा माणूस एका अपघातातून बचावला होता. मात्र, त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्याच्या तब्येतीला कंटाळून त्याने त्याच्या कुटुंबीयांना सांगितले की तो आपले जीवन संपवेल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
वांद्रे-वरळी सी-लिंक सुसाईड पॉइंट
मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी-लिंकला सुसाईड पॉइंट मानलं जातं. इथून अनेकदा लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने सरकारकडे उत्तर मागितल्यानंतर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवण्यात आली. आज पुन्हा एक घटना समोर आल्याने इथल्या हा मुद्दा वर आला आहे.