Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Sambhaji Bhide : भिडेंनी पुन्हा गरळ ओकली, वाहिली शिव्यांची लाखोळी!

Sambhaji Bhide : भिडेंनी पुन्हा गरळ ओकली, वाहिली शिव्यांची लाखोळी!
गांधीनंतर आता फुले, साईबाबा आणि राजा राममोहन रॉय यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केली टीका

अमरावती : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भिडेंच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे. भिडेंवर अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले होते. मात्र अद्यापही संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता त्यांनी महात्मा फुलेंविषयी (Mahatma Phule) वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

अमरावती येथे आयोजित व्याख्यानात बोलताना संभाजी भिडेंनी पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबा आणि राजा राममोहन रॉय यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. भिडे यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय आणि साईबाबांवर वादग्रस्त विधाने केली. ही टीका करतांना त्यांनी मध्ये मध्ये शिव्यांची लाखोळी वाहिली. त्यांच्या तीन तासांच्या भाषणात शेकडो शिव्या आणि जातीय फूट पाडणारी विधाने आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, साईबाबांसारख्या समाजसुधारकांबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

संभाजी भिडे यांनी महात्मा फुलेंबद्दल अश्लाघ्य भाषेत तोंडसुख घेतले. देशात इंग्रजांनी ज्या ……. समाजसुधारकांच्या पदव्या केल्या, फुलेही त्या समाजसुधारक नावाच्या भxxxx यादीतले असल्याचे वक्तव्य भिडेंनी केले.

ते म्हणाले की, इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकवण्यासाठी देशात सुधारक नावाची जात निर्माण केली. निवडक लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामिळनाडूतील रामास्वामी नायकर आणि महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा समावेश होता. या सगळ्यांच्या ढुंxxxx देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. यावर मी दोन तास भाषण करून मोठे खुलासे करू शकतो, असं भिडे म्हणाले.

आपला हिंदू समाज साईबाबाला पूजतो, त्या साईबाबांची लायकी काय ते तरी तपासा, आधी त्या साईबाबांना आपल्या घरा-घरातील देव्हाऱ्यातून बाहेर फेका. लक्षात ठेवा मी काय बोलतोय, मी काही डोके सटकलेला माणून नाही, मी सर्व जबाबदारीने बोलतोय, हे लक्षात घेऊन त्याला हिंदूचा देव मानू नका, असे जाहीर आवाहन भिडेंनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा