World record: फिलिपिन्सचा गोलंदाज लुकीजचा विश्वविक्रम

  247

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वात कमी वयात घेतल्या ५ विकेट्स


आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिघात फिलिपिन्सच्या संघाचा दबदबा नसला त्यांच्या एका गोलंदाजाने लक्ष वेधून घेतले. आयसीसी पुरूष टी२० वर्ल्डकप पूर्व आशिया - पॅसिफिक पात्रता फेरीत फिलिपिन्सचा १६ वर्षांचा वेगवान गोलंदाज केपलग लुकीजने ५ विकेट घेतले. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वात कमी वयात ५ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम(World record) केपलगने आपल्या नावे केला आहे.


१६ वर्षे आणि १४५ दिवस वयाच्या लुकीजने या सामन्यात ५ विकेट्स घेत इतिहास रचला. ९४ धावा वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या फिलिपिन्सच्या १६ वर्षांच्या या वेगवान गोलंदाजाने नव्या चेंडूवर वानुअतूच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडवली.


लुकीजला त्याची पहिली विकेट ही तिसऱ्या षटकात मिळाली. त्याने क्लेमेंट टॉमीला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात लुकीजने अँड्रमनसेल, रोनाल्ड तारी आणि जोशुआ रासू या तीन विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवली. यानंतर लुकीजने ज्यूनियर कल्टापौला बाद करत पाचवी विकेट घेतली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कोणते प्रयोग करणार ?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक : शुभांशू शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज

३ जणांना फाशी, ७०० जणांना अटक... इराणमध्ये मोसादच्या 'अंडरकव्हर एजंट्स'विरुद्ध जलद कारवाई

इराण इस्रायलच्या अंडरकव्हर एजंट्सविरुद्ध जलद कारवाई तेहरान: इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी (Iran Israel Ceasefire) 

इराण-इस्रायल युद्ध : ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे संभ्रम

पश्चिम आशियातील तणाव: ट्रम्प यांचा दावा, इराणने खोडला तेहरान : इराण-इस्रायल युद्धानं नवं वळण घेतलंय. इराणने

Mosquito Sized Drone: चीनने बनवला डासाच्या आकाराचा रोबोटिक्स ड्रोन, लष्करी ऑपरेशन्समध्ये होणार वापर

बीजिंग: चीनमध्ये एक मायक्रो ड्रोन विकसित करण्यात आला आहे, जो आकाराने डासाच्या आकाराचा आहे. यामुळे हा ड्रोन पकडणे

तोंडावर आपटले ट्रम्प,, युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणचे हल्ले सुरूच

तेल अविव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत.  इराण इस्रायलमध्ये