
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी लेक सिद्धी पोंक्षे पायलट झाल्यानंतरच्या पोस्टने सोशल मिडियावर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. अभिनेते किरण माने तसेच उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षे यांच्यावर टीका करणारी पोस्ट लिहिताच आता पोंक्षे यांनीही या सर्व टीकेचा समाचार घेतला आहे. यावेळी कुणाचेही नाव न घेता एक गोष्ट लिहित शरद पोंक्षे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
त्यांनी लिहिलं की, आपण संध्या देवघरात छान दिवा लावतो, तो फक्त देवासमोर प्रकाश पाडावा, घरात प्रसन्न वाटाव म्हणुन. पण त्याची वात उंदीर घेऊन पळतो व सर्व घराला आग लावतो. तस झालं तर आग वातीन नाही लावली तर ती उंदरानं लावली. नाही तर वातीचा मंद प्रकाश फक्त देवघरा पुरताच मर्यादित राहिला असता पण उंदरानं ती वात घरभर फिरवून संपूर्ण घराला आग लावली. तसं काहीतरी चालू आहे आता दोष मंद तेवणाऱ्या वातीचा? की वात गावभर फिरवून आग लावणाऱ्या उंदराचा?'', असा सवाल पोंक्षे यांनी पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे.