
का देण्यात आली धमकी? जाणून घ्या कोण आहे ही धमकी देणारी व्यक्ती...
कराड : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याविषयी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan) यांनी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी अधिवेशनात केली होती. या घटनेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना आज फोनद्वारे तसेच मेलद्वारे अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली. या घटनेमुळे त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून काही तासांतच संबंधित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अंकुश सौरते असं या धमकीचे फोन करणाऱ्याचं नाव आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा मुद्दा विधिमंडळात मांडला. या रागातूनच त्यांना धमकीचे फोन करण्यात आले. मात्र हे धमकीचे फोन करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अंकुश सौरते असं या धमकीचे फोन करणाऱ्याचं नाव आहे. ई-मेलचा आयपी अॅड्रेस हा नांदेड येथील आहे. याप्रकरणी कराड, नांदेडमध्ये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आता कराड पोलीस पथक नांदेडला जाण्याची शक्यता आहे. तसेच चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी देखील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पृथ्वीराज चव्हाणांनी काय मागणी केली ?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संभाजी भिडे यांनी भारताच्या राष्ट्रपित्याबद्दल निंदापूर्वक वक्तव्य केले आहे. अशाप्रकारे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. हा माणूस हे काम आज करत नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. आता त्यांच्या या वक्तव्याची त्वरित दखल घेण्यात यावी. जर संभाजी भिडे हा व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल अशाप्रकारचं विधान करत असेल तर तो बाहेर कसा फिरू शकतो? असा सवाल करत पृथ्वीराज चव्हाण सभागृहात आक्रमक झाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या मागणीमुळे त्यांना अक्षय चोराडे याने माजी मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन आणि मेल केले. मात्र काही वेळेनंतर पोलिसांनी या अंकुश सौरतेला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.