मुंबई : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide speech) यांनी त्यांच्या विदर्भ दौर्यामध्ये अमरावतीत महात्मा गांधीजींविरोधात (Mahatma Gandhi) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, तर यवतमाळमध्ये त्यांनी पंडित नेहरु (Pandit Nehru) यांच्याबद्दलदेखील वादग्रस्त वक्तव्य केलं. या गोष्टीवरुन राजकारणी, आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटना सध्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीसुद्धा तीव्र विरोध दर्शवला आहे.
दीपक केसरकर म्हणाले, संभाजी भिडेंना मी ओळखतो कारण ते गडकिल्ल्यांच्या संदर्भात काम करतात. एक तर त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करणं बंद केले पाहिजे. आणि ज्या प्रकारे त्यांनी भाष्य केलं आहे, मला वाटतं की हा वयोमानाचा परिणाम आहे. आमच्या गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे सगळं तपासून बघू. माझी स्वतःची त्यांच्याशी भेट झाली तर मी सांगेन की अशा प्रकारच्या विधानांमुळे राज्यालाच नाही तर देशालाही दुःख होतं त्यामुळे हे थांबवा, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
महात्मा गांधींना अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो, असं क्वचित देश असेल जेथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. त्यांच्यावर जे गलिच्छ स्वरूपात टीका करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यासोबत जाणं राजकारणासाठी आत्मघातकी आहे, महात्मा गांधींना असं बोललं तर देशातीलच तर नाहीच, गुजरातमधील कुठलाही बांधव-भगिनी सहन करेल का मग ते मोदी असतील किंवा शाह असतील, असं छगन भुजबळ म्हणाले.
त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवीन काहीतरी बोलत राहतात. काल ते पंडित नेहरूंनी देशासाठी काही योगदान नाही असं ते म्हणतात. पण त्यांचे वडिल देशातील सर्वात श्रीमंत वकील त्यांनी देशासाठी सर्व काही दिलं, स्वतः साडेअकरा वर्ष नेहरू तुरुंगात राहिलेत असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांची स्तुती करू नका पण असली टीका मला आवडत नाही, असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
संभाजी भिडे, खरं म्हणजे तो मनोभर भिडे याच्यावर आम्हीसुद्धा एक केस दाखल केली आहे. आमच्या बंगल्यातील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल या वक्तव्यावर कोर्टात ती केस सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे, आम्ही कोर्टात गेलो, पण कोर्टात तारीखच लागत नाही. शेवटी सरकार केस करणार, पण केस केल्यानंतर ती लवकर वर आली पाहिजे. तारखांवर तारखा पडतात. आम्ही स्वतः कोर्टात गेलो आहोत. मला कधी-कधी वाटतं की मनोहर भिडे यांचं डोक ठिकाण्यावर आहे की नाही, तेच मला कळत नाही” असेही छगन भुजबळ म्हणाले.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…