
भाईंदर : एकीकडे जोरदार पाऊस पडून पुरामुळे लोकांचे हाल झालेले असताना मीरा भाईंदरमध्ये मॅनहोलवरील गळतीमुळे पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याचा पुरवठा चार ते पाच तासांसाठी बंद करण्यात येणार आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात गैरसोय होणार नाही.
मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या शहाड ते टेमघर वरील पिंपळास येथील मॅनहोलवर अचानक गळती सुरू झाल्याने स्टेम प्राधिकरणाने दुरुस्ती कामाकरीता शहराचा पाणी पुरवठा बंद केला आहे. साधारण ४ ते ५ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा व मलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांनी सांगितले आहे.