पुणे: पुण्यात पकडलेल्या दोन (ATS) दहशतवाद्यांबाबत (pune terror case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोघे राहत असलेल्या घरातील फॅनमध्ये एक कागद सापडला असून या लपवलेल्या कागदात बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया हाताने लिहिलेली आहे. ॲल्युमिनीअम पाईप, बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्या. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केल्याची देखील माहिती मिळाली आहे.
हे दोघे पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोटाचा सराव करायचे. त्यासाठी हे जंगलात तंबू ठोकूनही काही दिवस राहिले होते. पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी महाराष्ट्र-बेळगाव सीमाभागातील निपाणी आणि संकेश्वरमध्ये काही दिवस मुक्कामाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा संशय आहे.
दरम्यान, हे दोन संशयित म्हणजेच मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी यांच्याकडून एटीएसने बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला होता. त्यात आता बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया असलेली चिठ्ठीदेखील सापडली आहे.