Monday, July 8, 2024
Homeक्रीडाAjinkya Rahane : रॉयल लंडन वनडे चषकातून अजिंक्य रहाणेने घेतली माघार

Ajinkya Rahane : रॉयल लंडन वनडे चषकातून अजिंक्य रहाणेने घेतली माघार

काय आहे या ब्रेकचे कारण?

लंडन : भारतीय कसोटी संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आता आपल्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने रॉयल लंडन वनडे चषकात (Royal London one-day cup) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने ब्रेक घेतला असल्याचे समजते.

अजिंक्य रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये तब्बल १८ महिन्यांनंतर टीम इंडियात परतला. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने चांगली कामगिरी केली. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणेसाठी विशेष काही घडले नाही.

या कामगिरीच्या जोरावर लीसेस्टरशायने (Leicestershire) अजिंक्य रहाणेचा आपल्या संघात समावेश केला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे रॉयल लंडन वनडे चषकात खेळणार होता, पण कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने ब्रेक घेतला आहे. म्हणून तो या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. याबाबत लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक क्लॉड हेंडरसन यांनी माहिती दिली आहे.

लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक म्हणाले की, ‘आम्ही अजिंक्य रहाणेची परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून त्याचे वेळापत्रक खूप तणावाचे होते. केवळ भारतातच नाही, तर राष्ट्रीय संघ जिथे जिथे दौऱ्यावर गेला आहे, तिथे अजिंक्य रहाणेही गेला आहे. आम्ही त्याच्याशी सतत संवाद साधत असतो आणि क्रिकेटमधील परिस्थिती लवकर कशी बदलते हे आम्ही जाणून आहोत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -