Wednesday, July 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका?

मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका?

दहशतवाद्यांकडे सापडले छाबड हाऊसचे फोटो

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये टार्गेट करण्यात आलेल्या छाबड हाऊसचे फोटो दहशतवाद्यांकडे सापडल्याने खळबळ माजली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दहशतवाद्यांकडून कुलाबा येथील चाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत. यामुळे यंत्रणा संतर्क झाल्या असून छबाड हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथील छाबड हाऊसचे काही गुगल फोटो संशयित आरोपींकडून सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर छबाड हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. छबाड हाऊसमध्ये आधीच अतिशय उच्च सुरक्षा आहे, अशी माहिती कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दोन आरोपींना हल्ल्याचा कट रचल्याबद्दल राजस्थानमधून अटक करण्यात आली. दरम्यान, या घडामोडीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंबई पोलिसांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांकडून मॉकड्रीलही घेण्यात आले.

एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही राजस्थानमधील रतलाम येथील असून ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर एनआयएकडून पाच लाख रुपये बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली होतं. त्याचबरोबर हे आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा तपासात निष्पन्न झालं आहे.

आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात रतलामचा मोहम्मद युनुस खान, मोहम्मद युसूफ शेख, गोंदियाचा अब्दुल कादिर पठाण आणि रत्नागिरीचा एक तरुण यांचा समावेश आहे. पण रतलामसारख्या मध्यप्रदेशातल्या शहरातून मुंबईमध्ये अतिरेकी कारवाया करण्यासाठी आलेल्यांना नक्की बळ कुठून मिळतं? अल-सुफा ही दहशतवादी संघटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती. राजस्थानच्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले. या संघटनेचे मुख्य लक्ष्य आरएसएसचे सदस्य आणि भाजप नेते असल्याचं तपासात समोर आलंय. एक दशकापूर्वी अल सुफा संघटना प्रकाशात आल्यानंतर सरकारने बंदी घातली होती. मध्यप्रदेशातून येऊन पुण्यात तळ ठोकून कोकणात प्रशिक्षण घेऊन मुंबईवर डोळा ठेवणाऱ्यांचं कनेक्शन आता पुण्यात एनआयएने अटक केलेल्या आयसिस मॉड्युलशीही आहे का? हेही तपासणं सुरु आहे.

आतापर्यंत राज्यभरातून ५ जणांना अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी गेल्या एका महिन्यात आयएसआयएस आणि अल सुफा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक केली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी ट्रेनिंग केले. निपाणी, संकेश्वरमध्ये मुक्काम केला. आंबोलीमध्ये बॉम्बचं प्रशिक्षण सुरु असल्याचे समोर आले. एटीएसनं पुणे आणि गोंदियातून अटक केलेल्या ४ दहशतवाद्यांकडून मिळालेली माहिती, ही अत्यंत धक्कादायक आहे. या चौघांकडे मिळालेलं साहित्य आणि त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे चौघेही एका मोठ्या अतिरेकी हल्ल्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे.

मूळचे मध्य प्रदेशच्या रतलामचे असलेले हे दोघे सुफा नावाच्या मध्य प्रदेश येथील दहशतवादी संघटनेसोबत काम करत होते. हे दोघे इसिसकडून प्रेरित असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. जयपूर येथे स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. अशी माहिती देखील मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -