Friday, March 21, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सCyber Crime : कंपनीच्या बँक खात्यातून लाखोंची ऑनलाइन फसवणूक

Cyber Crime : कंपनीच्या बँक खात्यातून लाखोंची ऑनलाइन फसवणूक

  • महेश पांचाळ : गोलमाल

दक्षिण मुंबईतील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या व्यवसाय खात्यातून जूनच्या शेवटच्या आठवड्यात १९ लाख रुपये बेकायदेशीरपणे हस्तांतरित झाल्याची बाब निदर्शनास आली. कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून ते पैसे हस्तांतरण केले नसतानाही, हे हस्तांतरण कसे झाले? असा प्रश्न कंपनीच्या संचालकांना पडला होता. नेट बँकिंग सुविधेचा बेकायदेशीरपणे वापर करून पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले गेले होते. तक्रारदार संचालक अनिल छगनलाल जैन हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या कंपनीचे व्यवहार आरटीजीएस आणि चेकद्वारे होतात. पैसे गेल्याचे समजताच त्यांनी दक्षिण मुंबई सायबर विभागात धाव घेतली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. कंपनीचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले होते. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान एका आयपी ॲड्रेसची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. प्राथमिक तपासात हा संपूर्ण व्यवहार राजस्थानच्या जयपूर शहरातून झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांचे पथक राजस्थानमध्ये गेले आणि त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. हे हस्तांतरण राजस्थानमधील एका व्यक्तीच्या मोबाइल फोनवरून इंटरनेट वापरून करून करण्यात आल्याची बाबही समोर आली.

सायबर पोलिसांच्या पथकांने सत्येंद्र राजवत (वय ४४) आणि त्याचा भागीदार मुकेश चौधरी (वय ३५) या दोघांची कसून चौकशी केली. हे दोघेही ई-कॉमर्स व्यवसायिक असल्याची माहिती पुढे आली. या गुन्ह्यानंतर पोलीस आपला पाठलाग करतील हे माहीत असल्याने त्यांनी आपला थांगपत्ता लागू नये यासाठी एक क्लृप्ती शोधून काढली होती. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणार हे पोलिसांना कळू नये तसेच हे दोघे आरोपी त्यांचे लोकेशन लपवण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) डिव्हाइस वापरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या व्हीपीएन नंबरमुळे पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला होता. पोलिसांनी राजवत आणि चौधरी या दोघांना जयपूरहून अधिक चौकशीसाठी मुंबईला आणले. दोघांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या दोघांना पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. या घोटाळ्यात आणखी काही साथीदार गुंतले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विशेष म्हणजे कंपनीचे जे लाखो रुपये हस्तांतरित केले गेले, ते पैसे अद्याप तक्रारदाराला परत मिळाले नसून, आपले पैसे कधी मिळतील या प्रतीक्षेत कंपनी आहे.

एका खासगी कंपनीच्या बँक खात्यातून सुमारे १९ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी दोन ई-कॉमर्स व्यावसायिकांना राजस्थान येथून दक्षिण प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अटक केली. सत्येंद्रसिंह राजावत आणि मुकेशकुमार चौधरी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी आहे. ते दोघेही ई-कॉमर्स व्यावसायिक असून, त्यांनी अशाच प्रकारे इतर कंपनीच्या बँक खात्याचा सर्व्हरचा ताबा घेऊन फसवणूक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. २५ मे रोजी त्यांच्या बँक खात्यातून इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन व्यवहार होऊन १९ लाखांचा अज्ञात व्यक्तींनी अपहार केला होता.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -