
मुंबई : मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे (Malkapur Accident) झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
मलकापूर (जि.बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्गावर दोन खाजगी बस अपघातात झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत तर जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 29, 2023
बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत.
या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.