 
                            तीन भारतीय फुटबॉलपट्टूंना आशियाई क्रीडा(Asian Games) स्पर्धेतून वगळले, केवळ २३ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश
भारतीय फुटबॉल संघाचे स्टार खेळाडू सुनील छेत्री, गुरप्रीत सिंग संधू (गोलकीपर) आणि संदेश झिंगन यांना आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ साठी संघात स्थान मिळालेले नाही. चीनमधील हांगझोऊ येथे ही स्पर्धा होणार आहे.
वयामुळे या खेळाडूंना आशियाई क्रीडा २०२३(Asian games 2023) मध्ये स्थान मिळाले नाही, असे एआयएफएफने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. आशियाई क्रीडा २०२३ मधील फुटबॉल संघात प्रामुख्याने २३ वर्षांखालील खेळाडूंचा समावेश असावा. पण, या तिन्ही खेळाडूंचे वय जास्त आहे.
आशियाई खेळ २०२३ मध्ये फक्त २३ वर्षांखालील खेळाडू फुटबॉल खेळत असल्याची माहिती आहे. याशिवाय एका संघात या वयापेक्षा जास्त तीन खेळाडूंनाही परवानगी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या पुरुष फुटबॉल संघात एकूण २२ खेळाडूंचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयओएआणि एआयएफएफ ने वैयक्तिकरित्या एशियाड आयोजकांना या खेळाडूंचा समावेश करण्यासाठी सूट देण्यास सांगितले आहे. आशियाई खेळ २३ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत खेळवले जातील.
पुरुष फुटबॉल संघ : अन्वर अली, गुरमीत, लालेंगमाविया, नरेंद्र, रहीम अली, लालनंतलुआंगा बावित लुंग, रोहित दानू, प्रभसुखान सिंग गिल, अनिकेत अनिल जाधव, राहुल कन्नोली प्रवीण, अमरजीत सिंग कियाम, आकाश मिश्रा, धीरज सिंग मोइरांगथेम, महेंद्रसिंग, मोइरांगथेम, महेश सिंह. सिंग नौरेम, रोशन सिंग नौरेम, शिवशक्ती नारायणन, आशिष राय, विक्रम प्रताप सिंग, दीपक टांगरी, जॅक्सन सिंग थौनाओजम, सुरेश सिंग वांगजाम या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

 
     
    




