Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीSuicide Case in Pune : पुण्यात आणखी एक खळबळजनक घटना... फर्ग्युसन महाविद्यालयात...

Suicide Case in Pune : पुण्यात आणखी एक खळबळजनक घटना… फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लावला गळफास!

नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अनेक चित्रविचित्र घटना घडत आहेत. पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुण विद्यार्थ्यांच्या बाबतीतील या घटना जास्त प्रमाणात आहेत. अशीच एक खळबळजनक घटना पुन्हा समोर आली आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) शिकणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओम कापडणे (Om Kapadane) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यातील वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात (Vishnu Kunj Hostel) राहत होता आणि या ठिकाणीच त्याने आत्महत्या केली.

ओम कापडणे फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात (BSc Third year) शिकत होता. तो मूळचा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील होता आणि शिक्षणाकरता त्याने पुणे गाठले होते. पुण्यात वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात तो राहत होता. याच वसतिगृहात त्याने गुरुवारी २७ जुलैला गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच ओमला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केलं.

या प्रकरणाची चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ओमने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याने वसतिगृहातील ज्या खोलीत गळफास घेतला तिथे कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही किंवा अजूनपर्यंत काही हाती लागलेले नाही. त्यामुळे पोलीस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा कसून तपास सुरु असल्याचं चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -