मुंबई : भर पावसाळ्यात पाणीकपातीचा सामना करत असलेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक सागर (Modak Sagar) तलाव २७ जुलैच्या रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे धरणातून ६००० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने ट्विट करत दिली आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (२७ जुलै २०२३) रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे.#BMC #BmcUpdates pic.twitter.com/507yzKd8tL
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 27, 2023
गेल्या १५ दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून धरणक्षेत्रातील पाण्याची आवक वाढत आहे.