Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीWamanrao Pai : मृत्यूचे भय वाटण्याचे कारण नाही...

Wamanrao Pai : मृत्यूचे भय वाटण्याचे कारण नाही…

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

डॉ. मर्फींनी एका ठिकाणी सुंदर म्हटले आहे, You are the son of of infinite life which knows no end and you are the child of Eternity. Life is self renewing, eternal and indestructible and is reality of all men. You live forever because your life is God’s life. Reality of all creation असे म्हटले पाहिजे. Reality of all men पेक्षा Reality of all creation हे बरोबर आहे.

Reality काय आहे. God is life and Life is self renewing, eternal and indestructible. मी जीव आहे, मी Life आहे, मी God आहे, मी दिव्य आहे. मी परमेश्वर आहे हे सत्य असल्यामुळे मला जरी ते कळत नाही, तरी नकळत हे मला ठाऊक आहे. लोक मला म्हणतात की, वामनराव तुम्ही कोड्यात बोलता. प्रत्यक्षात मी कोड्यात बोलत नाही. गंमत अशी की आपल्याला हे ज्ञात नाही, हे जरी खरे असले तरी आपल्या ठिकाणी ती एक जाणीव आहे व त्यामुळे आपल्याला असे वाटत राहते की, आपण कधीही मारणार नाही. मी कधीही मारणार नाही, कारण Life is self renewing, eternal and indestructible, मी अखंड आहे, मला मरण कधीही नव्हते. आजही नसणार व उद्याही नसणार. मग आता कोणीही मरणाला घाबरण्याचे कारण नाही. फक्त आपण पोशाख बदलतो, पोशाख बदलतो तेव्हा माणूस तोच असतो. आतापर्यंत किती पोशाख बदलले तरी तुम्ही आहात तेच आहात.

एरव्हीसुद्धा तुम्ही डोळे मिटून बसता व आहे याचा अनुभव घेता. ‘मी आहे’ ‘मी आहे’ असे म्हणतो ते चूक आहे. ‘आहे तो मी’ आहे, हे खरे आहे. ‘मी आहे’ ही भाषाच चुकीची आहे. ते तत्त्व जे आहे ते मी आहे व ते तत्त्व अमर आहे, म्हणून मी अमर आहे. किंबहुना मी मी म्हणणारे ते तत्त्वच आहे, ते दिव्य तत्त्वच मी मी म्हणत असते.

‘माणसाची देव चालावी अहंता, मीच एक कर्ता म्हणोनिया वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे’ हे मी का सांगतो आहे, युधिष्ठिरने जे उत्तर दिले ते देहाच्या अंगाने बरोबर होते. पण आपण केवळ देह नाही जीवही आहोत. शरीर हे सुद्धा आपलेच रूप आहे. शरीरापासून ते देवापर्यंत सर्व काही दिव्य आहे, ही गोष्ट नीट लक्षात ठेवली, तर आपण अमर आहोत हे वाटते. त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.

जगात आणखी एक आश्चर्य आहे. मला जर विचारले जगातले सर्वात मोठे आश्चर्य कोणते?, तर माझे उत्तर असे असेल की, दारू पिऊन सर्वनाश होतो हे माहीत असूनसुद्धा लोक दारू पितात, हे जगातले सर्वात मोठे आश्चर्य आहे. दारू पिऊन आपल्या कुटुंबाची वाताहत होते, बायका मुले उघड्यावर पडतात, घरदार विकण्याची वेळ येते, ती दारू आपल्याला क्षणाक्षणाला मारते. ही दारू किती वाईट आहे हे कळूनसुद्धा लोक दारू पितात, हे जगातले सर्वात मोठे आश्चर्य आहे. असे मी म्हणजे वामनराव पैंनी यक्षाला उत्तर दिले असते. यातील विनोदाचा भाग सोडला, तर बहुअंशी हे सत्य आहे. गंमत अशी की, मी अमर आहे यांत काही आश्चर्य नाही. मी अमर आहे हे सतत स्मरणात ठेवायचे. मृत्यूची भीती वाटण्याचे काही कारण नाही. आता हे स्मरणात ठेवायचे की, न ठेवायचे हे तू ठरव कारण, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -