महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजहार आणि प्रहारराजकीयमहत्वाची बातमी
Narayan Rane : महाराष्ट्रात आज एका टिनपाटाच्या डब्ब्याचा चिरका ताशा तडतडतोय!
July 27, 2023 06:10 AM 1643
टिनपाटाच्या डब्ब्याचा चिरका ताशा (भाग-१)
भाजपच्या पाठीत २०१९ साली बेईमानीचा खंजीर खुपसून हिंदुत्वाशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे स्वतःलाच सुसंस्कृत आणि इमानदार म्हणवून घेतात. याला निर्लज्जपणाशिवाय दुसरे नाव नाही. अडीच वर्षात अडीच तास सुद्धा मंत्रालयात आले नाहीत आणि अडीच वर्ष काम केले म्हणतात. घरबशेपणा हेच त्यांच्यासाठी काम!
स्वतःच्या भाऊ भावजयांना जो आपल्या बरोबर ठेवू शकत नाही. त्याने महाराष्ट्रातील जनता मला आपल्या कुटुंबापैकी एक समजते असे म्हणणे हा मोठाच विनोद. भाजपची कावीळ झाल्यामुळे यांना दुसरं काही दिसत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा एकही प्रश्न या काविळीमुळे त्यांना दिसत नाही. आपल्या सत्तालोलुपतेमुळे यांनी शिवसेना संपविली आणि खापर दुसऱ्यांवर फोडत आहेत. दुसऱ्यांना नावे ठेवली तरी सत्तालोलुपतेमुळे तुम्ही स्वतःच्या वडिलांच्या विचारांना मूठमाती दिली हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही.
याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण होताना तुम्ही हातावर हात ठेवून गप्प होतात हेही जनतेच्या लक्षात आहे. एकाच मुलाखतीमध्ये अजित पवार घोटाळेबाज आणि प्रामाणिक सुद्धा! याला स्मृतिभ्रंश म्हणायचे की दोन दगडांवर पाय म्हणायचे ? ... क्रमशः
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra