श्री स्वामी समर्थाचे कार्य दाहीदिशेला पोहोचत होते. श्री स्वामींच्या कृपा-आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर जनकल्याण होत होते. स्वामींचा जयजयकार अनेक सेवेकरी अखंडपणे करीत होते.स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या मनोकामना स्वामी कृपेने पूर्ण होत होत्या. मठात गर्दी मावत नव्हती. अनेक राज्यांतून लोक दर्शनाला येत होते.
अक्कलकोटला त्या काळात गोविंदबुवा भट नावाचा एक स्वामीभक्त होता. तो अत्यंत गरीब होता. अक्कलकोटात भिक्षुकी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पण तेवढे करूनही त्याच्या कुटुंबाचे भरण-पोषण होत नव्हते. तरी स्वामींचे नित्य दर्शन त्याने टाळले नाही.
श्री स्वामींच्या चरणी अहोरात्र सेवा करावी. त्यांच्या सान्निध्यात आयुष्य कंठावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे, असे त्याला सारखे वाटायचे. पण प्रपंचाच्या व्यापातून त्याची सुटका होत नव्हती. श्री स्वामी समर्थांच्या पायाशी बसून ‘आपल्या मुला-बाळांच्या पोटापाण्याची काहीतरी सोय करा!’ अशी विनंती करावी अशी इच्छा त्यांच्या मनात अनेकदा निर्माण व्हायची. पण संकोचाने गोविंदबुवा काही बोलत नसत. ते विद्वान होते. धर्मशास्त्राचे त्यांना ज्ञान होते. पण तरीही त्यांच्यावर उपासमारीची वेळ यायची. एकदा मनाचा निर्धार करून गोविंदबुवा श्री स्वामींच्या दर्शनासाठी आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवण्यासाठी श्री स्वामींच्या मठात गेले. स्वामींच्या पुढ्यात जाऊन बसले. त्यांची पाळी आल्यावर त्यांनी स्वामींच्या पायांवर डोके ठेवले. दर्शन घेऊन ते पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. आपल्याला स्वामींशी बोलायला कधी संधी मिळते याची ते वाट पाहत बसले.
मठात भाविकांची, दर्शनार्थींची गर्दी होती. ती कमी होईना, त्यामुळे गोविंदबुवांना बोलता येईना. श्री स्वामी तर पूर्ण अंतर्ज्ञानी. त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही. गोविंदबुवांच्या मनातील इच्छा देखील श्री स्वामींनी बरोबर ओळखली. गोविंदबुवांना आपल्याजवळ बोलावून ते म्हणाले, ‘बुवा आपल्या घरी जा. घराच्या पसरबागेत फुलांचे एक झाड आहे. त्याच्या मुळाशी खणा! जे मिळेल त्यावर समाधान माना आणि सुखाने जगा!’ श्री स्वामींची आज्ञा घेऊन गोविंदबुवा घरी आले. कुदळ घेऊन पसरबागेत गेले. श्री स्वामींवर विश्वास ठेवून फुलाच्या झाडाखाली खणले. झाडाच्या मुळाशी खोल खड्डा केल्यानंतर त्यांना तिथे विपुल धनसाठा सापडला. तो धनसाठा बघून गोविंदबुवा आणि त्यांच्या कुटुंबीयांचे डोळे दीपले. सर्वांना मोठा आनंद झाला. बुवांचे दारिद्र्य संपले होते. त्यांना सुखाचे दिवस आले ही सारी श्री स्वामींची कृपा! त्या दिवसापासून गोविंदबुवा अखंडपणे श्री स्वामींच्या सेवेत राहिले. त्यांनी अनेक वर्षे मनोभावे श्री स्वामींची सेवा केली.
स्वामी ईश्वरी अवतार
स्वामी अवतार वटवृक्ष
स्वामी स्वतःच कल्पवृक्ष ॥१॥
स्वामी मधुरफळ आम्रवृक्ष
स्वामी चमत्कारिक अजानवृक्ष ॥२॥
स्वामी बेलगाम अर्जुनवृक्ष
शस्त्रेच स्वामीपाशी शमीवृक्ष ॥३॥
स्वामी भूत उतरवी पिंपळ वृक्ष
तरकधी समंध बोरी बाभळी वृक्ष ॥४॥
स्वामी सदा असती दक्ष
स्वामी स्वतःच स्वर्गीय यक्ष ॥५॥
सोडवीती भक्तांचे प्रश्न यक्ष
भक्तांना स्वामी देती जीवन बक्ष॥६॥
स्वामी वाचवती राक्षसांचे भक्ष
स्वामी आकाशीचे सुंदर नक्षत्र ॥७॥
स्वामी येती तोडूनी अक्ष
भक्त तारणहारात स्वामी दक्ष ॥८॥
स्वामी कीर्ती गुलाब गंध
स्वामी कीर्ती सोनचाफा सुगंध ॥९॥
भक्त सेवेत बनती चंदनगंध
स्वामी वाचवती बनूनी रक्तचंदन
गंध ॥१०॥
कधी स्वामीची चाल मंद
कधी वेगे अदृश्य धुंद ॥११॥
श्री स्वामी समर्थ मंत्र तीन
स्वामी बदलतील आयुष्याचा सीन ॥१२॥
हनुमानापरी स्वामींचे उड्डाण
नारदापरी स्वर्गलोकातही प्रयाण ॥१३॥
सप्त समुद्रही स्वामींना तोकडे
स्वामींचे हिशोब सारे रोकडे ॥१४॥
स्वामी दूर करती पाण्यातले खेकडे
साऱ्या संकटात स्वामी खडे ॥१५॥
स्वामींच्या हातातच हिऱ्यांचे खडे
स्वामी वाटती कोहिनूर हिऱ्यांचे खडे ॥१६॥
स्वामी विरोधकांची उडवी रेवडे
स्वामीनाम गरिबांनाही परवडे ॥१७॥
स्वामीनामे दान करा पैसा
स्वामी देतील पाऊस पैसा ॥१८॥
तुम्ही वाजवा आरती टाळी
स्वामी मारतील शत्रुलाच गोळी ॥१९॥
द्या गाईवासरे चारा
दुःखाला नाही थारा ॥२०॥
द्या गरीब विद्यार्थीला पुस्तके
धरतील ते तुम्हा मस्तके ॥२१॥
द्या तुम्ही रोगी औषधे
आयुष्य होईल निरोगी अवघे ॥२२॥
स्वामीनामाने धीर धरा धीर धरा
विरोधका फिरवतील गरागरा ॥२३॥
स्वामी ब्रह्माविष्णू महेश मूर्ती
स्वामीत सामावले दत्तमूर्ती ॥२४॥
करा स्वामींची रात्रदिन पूजा
आईबाप स्वामीशिवाय
नाही कोणी दुजा ॥२५॥
***
श्री स्वामी समर्थ स्तवन
नाही जन्म नाही नाम।
नाही कुणी माता पिता।
प्रगटला अदभुतसा।
ब्रह्मांडाचा हाच पिता ॥ १ ॥
नाही कुणी गुरुवर। स्वये हाच सूत्रधार।
नवनाथी आदिनाथ।
अनाथांचा जगन्नाथ ॥ २ ॥
नरदेही नरसिंह। प्रगटला तरुपोटी।
नास्तिकाच्या कश्यपूला।
आस्तिकाची देण्यागती ॥ ३ ॥
कधी चाले पाण्यावरी।
कधी धावे अधांतरी।
यमा वाटे ज्याची भीती।
योगीश्वर हाच यती ॥ ४ ॥
कधी जाई हिमाचली।
कधी गिरी अरवली।
कधी नर्मदेच्या काठी।
कधी वसे भीमातटी ॥ ५ ॥
कालीमाता बोले संगे। बोले कन्याकुमारीही। अन्नपूर्णा ज्याचे हाती।
दत्तगुरू एकमुखी ॥ ६ ॥
भारताच्या कानोकानी।
गेला स्वये चिंतामणी।
सुखी व्हावे सारे जन।
तेथे धावे जनार्दन ॥ ७॥
प्रज्ञापुरी स्थिर झाला।
माध्यान्हीच्या रविप्रत।
रामानुज करी भावे।
स्वामी पदा दंडवत ॥ ८॥
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ॥
ॐ श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ॥
vilaskhanolkardo@gmail.com
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…