
नवी दिल्ली: केंद्र सरकारने मागणी केल्याप्रमाणे आता संजय कुमार मिश्रा (Sanjay Kumar Mishra) यांना ईडीचे (ED) संचालक म्हणून १५ सप्टेंबरपर्यंत मुदतावाढ देण्यात आली आहे. मिश्रा हे फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सच्या (Financial Action Task Force FATF) पुनर्रचनेच्या प्रकियेत सहभागी असल्याने राष्ट्रीय हितासाठी त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने न्यायालयाकडे केली होती. एसके मिश्रा यांचा ईडी संचालक म्हणून कार्यकाळ ३१ जुलै रोजी संपणार आहे.
संजय मिश्रा यांचा ईडीचे संचालक म्हणून ३१ जुलैपर्यंत कार्यकाळ होता. याला आठवडा बाकी असताना केंद्राने पुन्हा सुप्रीम कोर्टात संजय मिश्रा यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती.