Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेNCP office inauguration in Thane : 'या' कारणामुळे राष्ट्रवादीचा ठाण्यातील कार्यक्रम रद्द

NCP office inauguration in Thane : ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीचा ठाण्यातील कार्यक्रम रद्द

स्वतः अजित पवार यांनी दिली माहिती…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार पावसामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला (NCP office inauguration) उपस्थित राहण्याचा आपला नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झाला असल्याने अजित पवार यांनी स्वतः हा कार्यक्रम रद्द केला आहे. काही दिवसांनंतर हा कार्यक्रम पुन्हा नियोजित करण्यात येईल, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

अजित पवार यांनी व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईमध्ये सगळ्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. सरकारने आवाहन केलं आहे की, कामाशिवाय कोणी घराबाहेर पडू नका, घरातच राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जेव्हा आम्हीच सर्वांना अशा प्रकारचं आवाहन करतो, तेव्हा स्वतः निघून ठाणे परिसरात येणं मला उचित वाटलं नाही. पुढे ते म्हणाले, ज्या दिवशी सरकारने कोणताही अलर्ट जाहीर केलेला नसेल, त्या दिवशी मी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करेन.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -