Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणTerrorist attack: महाराष्ट्रात दहशतवाद्यांच्या कुरापतींना जोर, एटीएसने केल्या धडक कारवाया!

Terrorist attack: महाराष्ट्रात दहशतवाद्यांच्या कुरापतींना जोर, एटीएसने केल्या धडक कारवाया!

रत्नागिरी: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (Maharashtra ATS) ॲक्शन मोडमध्ये असून रत्नागिरीतील (Ratnagiri) एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दहशतवादी कास्तिल दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कादिर याला अटक करण्यात आली आहे. याआधी पूण्यातून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरी येथील एटीएसच्या नवी मुंबई युनिटने या व्यक्तीला पकडलं असून त्याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसंच या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्याने नमूद केलं.

दोन अतिरेकी अटकेत, एक जण पळून जाण्यात यशस्वी

यापूर्वी याप्रकरणी पूण्यातील मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान (वय-२३, रा.कोंढवा,पुणे) व मोहम्मद युनुस याकुब साकी (वय-२४,रा.कोंढवा,पुणे, दोघे मु.रा.रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आलेली आहे. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. अटकेतील दोघांना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली.

वॉण्टेड दहशतवाद्यांवर एनआयएकडून बक्षीस

तत्पूर्वी या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्यांचा शोध घेत होती. एनआयएने मोहम्मद शहनवाज आलम याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम देखील जाहीर केले आहे. हे दोघं १५ महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -