
रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) लांजा तालुक्यातील आंजनारी पुल येथील वाहतूक पुर्ववत झाली आहे. जिल्हाधिकारी येऊन देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सगळ्या भागाचा दौरा करून पाहणी केल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. तर याच मार्गावर संगमेश्वर हद्दीत बावनदी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.
रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून काहीकाळ मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल हा वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.