मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीची मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नक्कल केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेत संतोष धुरी हे आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. आवाज कुणाचा या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली. तर या मुलाखतीचा मनसे व्हर्जन बनवत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या वाढदिवसासाठी हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
आवाज कुणाचा एक मुलाखत pic.twitter.com/GU5YZ8BqqN
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2023
दरम्यान, “मला घरी बसायला आवडतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री, मर्दाची औलाद, दिल्लीश्वर, अफजलखानाच्या फौजा, औरंगजेब, मास्क, सुरक्षित अंतर, कपटी, मशाला, कोरोना, गद्दार, मशाल, थोडंथोडं हिंदुत्व, मी संकटात असलो की मराठी माणूस, खंजीर, मिंदे गट, खोके…. मुलाखत संपली” असं बोलत देशपांडे यांनी ठाकरेंची नक्कल केली आहे.